'पापा मला आजचं जेलमधून बाहेर काढा...' असं कोण म्हणालं

जेलमधून बाहेर येण्यासाठी लागली हुरहूर

Updated: Oct 29, 2021, 03:42 PM IST
'पापा मला आजचं जेलमधून बाहेर काढा...' असं कोण म्हणालं title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला गुरूवारी जामीन मंजूर झाला. आज आर्यन तुरूंगातून बाहेर येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यनला जामीन मंजूर झाल्यामुळे शाहरुख आणि गौरी प्रचंड आनंदी आहेत. त्यामुळे बॉलिवूडकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढंच नाही तर अनेक कलाकारांनी दोघांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहे. आर्यनसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चेंटला देखील जामीन मंजूर झाला आहे. 

दरम्यान अरबाजचे वडील अस्लम यांनी मुलाची भेट घेतली. त्यांची भेट 20 मिनिटांची होती. यावेळी अरबाजने आनंद व्यक्त करत आज तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी वडिलांना सांगितलं आहे. यावर अस्लम म्हणाले 90 टक्के बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावर अरबाज म्हणाला 90 टक्के नाही 100 टक्के मला आज तुरूंगातून  बाहेर काढा... असं वडिलांना सांगितलं आहे. 

यावेळी असलम आर्यनबद्दलही बोलले. आर्यनला जामीन मिळाल्याने तो खूप आनंद झाला आहे. आज अरबाज आणि इतर दोन लोक बाहेर यावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही फक्त ऑर्डरची वाट पाहत आहोत. आज दुपारपर्यंत ऑर्डर येणे अपेक्षित आहे....

आज संध्याकाळपर्यंत आर्यन तुरूंगातून बाहेर येणार आहे. आर्यनच्या प्रतीक्षेत संपूर्ण खान कुटुंब आणि शाहरुखचे चाहते आहेत.  आर्यनच्या अटकेपासून शाहरुख खान मीडियापासून सतत दूर राहत होता. यादरम्यान त्याचा कोणताही फोटो समोर आला नव्हता, पण आज या फोटोवरून शाहरुखच्या आनंदाचा अंदाज लावता येतो.