मुंबई : सर्व राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. चिन्हामुळे गुन्हेगारी वाढत असल्यानं चिन्ह रद्द करा अशी मागणी अण्णांनी केलीय. मतदान यंत्रावर केवळ उमेदवाराचे नाव आणि फोटो असायला हवा असं अण्णांचं म्हणणं आहे. याबाबत निवडणूक आयोगानं मागणी मान्य न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.