मुंबई : मुंबई महापालिकेतील महापौरपद टिकवण्यासाठी शिवसेनेत मोठ्या हालचाली झाल्या असून ६ मनसे नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील महापौरपद कायम राहणार आहे.
यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली की, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष आता मजबुतीने उभा आहे.
अनिल परब म्हणाले की, “आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मनसेचा एक गट शिवसेनेत विलीन झाला आहे. ज्यांना मूळ पक्षात परत येण्याची इच्छा होती, त्याला मी फक्त कायदेशीर स्वरुप दिलं,” असंही परब म्हणाले.
किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, “किरीट सोमय्यांची गणितं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ह्या म्हणीप्रमाणे आहेत. त्यांचं स्वप्न भंग झालंय, त्यांचं दुःख मी समजू शकतो.”