7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री

भारतीय असा उद्योजक ज्याची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात तो लवकरच हा व्यक्ती एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत एन्ट्री घेऊ शकतो. 

नेहा चौधरी | Updated: Sep 9, 2024, 02:42 PM IST
7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री  title=
An Indian who owns 704196 crores will be the second trillionaire in the world Entering the list with elon Musk surpassing Mukesh Ambani

भारतीय सर्वात श्रीमंत व्यक्तींची नाव घेतली तर या यादीत मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी यांची नावं समोर येत असतात. श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये कायम रस्सीखेच पाहिला मिळते. या दोघांची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होतेय. अशात एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत कोण एन्ट्री मारणार हे पाहवं लागणार आहे. 

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सने नोंदवलेल्या 251 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पटकावलाय. कनेक्ट अकादमीच्या अंदाजानुसार मस्क 2027 पर्यंत ट्रिलियनियर दर्जा प्राप्त करण्याचा तयारीत आहेत. जर त्याची संपत्ती 110% च्या सरासरी वार्षिक दराने वाढत राहिली तर ही जादू सहज होऊ शकते. 

याच अहवालानुसार, भारतातील अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे ट्रिलियनियर दर्जा गाठणारे दुसरे व्यक्ती असण्याची अपेक्षा वर्तविण्यात आलीय. अदानीची संपत्ती सध्याच्या 123% वार्षिक दराने वाढत राहिल्यास 2028 पर्यंत ते ट्रिलियनेअर यादी एन्ट्री मारू शकतात. 

अहमदाबाद मुख्यालय असलेल्या अदानी उद्योगसमूह हे भारतातील बहुराष्ट्रीय उद्योगसमूहापैकी एक आहे. 5 लाखांच्या भांडवलासह गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग फर्म म्हणून सुरुवात केली. 1990 मध्ये अदानी समूहाने मुंद्रा येथे आपले स्वतःचे बंदर उभं केलं. त्यानंतर एक एक कंपनीची मुहूर्त मेढ ते रोवत गेले. अदानी पॉवर 2014 मध्ये भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज उत्पादक नावारूपाली आली. 

हेसुद्धा वाचा - मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

गौतम अदानी ₹7,04,196 कोटी संपत्तीसह सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते अदानी समूहामार्फत विविध प्रकारच्या व्यवसाय उपक्रमांवर देखरेख करतात. अदानी पोर्ट्स ही समूहातील प्रमुख कंपनी असून एका मोठ्या उपक्रमात, अदानी समूह, अदानीच्या नेतृत्वाखाली, बंदरातील कामकाजाला चालना देण्यासाठी ₹24,973 कोटींच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची योजना आखत आहेत. मिंटच्या अहवालानुसार. कंपनी आपल्या धोरणात्मक विस्ताराचा भाग म्हणून युरोप आणि भारत यांच्यातील व्यापार मार्गावरही बारकाईने लक्ष ठेवून आहे.

फोर्ब्सनुसार ₹7,14,460 कोटी (USD 85.5 बिलियन) ची रिअल-टाइम संपत्ती असलेले गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 61 वर्षीय अदानी एंटरप्रायझेसचे प्रमुख आहेत. ज्यांचे बाजार भांडवल ₹3.64 लाख कोटी आहे आणि विविध नवीन प्रकल्पांद्वारे त्यांचं व्यवसाय साम्राज्य वाढवत आहे. त्यांचा पगार त्याच्या उद्योगातील अनेक सहकाऱ्यांपेक्षा आणि अगदी त्याच्या स्वत:च्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे.

31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, अदानीला एकूण 9.26 कोटी रुपयांची भरपाई मिळाली. समूहाच्या सूचीबद्ध घटकांच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांनी त्यांच्या पोर्ट-टू-एनर्जी समूहातील दहापैकी फक्त दोन कंपन्यांकडून पगार काढला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) या समूहाच्या प्रमुख फर्ममधून त्यांनी पगारात ₹2.19 कोटी कमावले आणि ₹27 लाख लाभ मिळून एकूण ₹2.46 कोटी होते. मागील वर्षाच्या तुलनेत 3% ची वाढ पाहिला मिळत आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी अदानी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेड (APSEZ) मधून ₹ 6.8 कोटी कमावले.

अदानीची कमाई भारतातील मोठ्या कुटुंबाच्या मालकीच्या समूहांच्या प्रमुखांच्या तुलनेत माफक आहे. उदाहरणार्थ, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून त्यांचा संपूर्ण पगार मागे घेतला आहे. यापूर्वी ते ₹15 कोटींवर मर्यादित होते. अदानीचा पगार दूरसंचार उद्योगपती सुनील भारती मित्तल (₹16.7 कोटी), राजीव बजाज (₹53.7 कोटी), पवन मुंजाल (₹80 कोटी), L&T चेअरमन SN सुब्रह्मण्यन आणि Infosys CEO सलील एस पारेख यांच्यापेक्षाही खूप कमी आहे.