मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या चौकशीत देशमुख दोषी आढळलेत. त्यामुळं त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
ओएसएम म्हणजेच ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासण्याच्या टेंडर प्रक्रियेतल्या अटी शर्तींचं पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
संजय देशमुखांवर संभाव्य कारवाई झाल्यानंतर नवीन कुलगुरु नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्च समिती गठीत करुन नवीन कुलगुरु नेमण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.