Anil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..

जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

Updated: Dec 28, 2022, 10:53 AM IST
Anil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..  title=

Anil Deshmukh Granted Bail : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रावदीचे नेते अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh) अखेर जेलमधून बाहेर यणार आहेत. अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयची (CBI) मागणी उच्च न्यायालयानं फेटाळाली आहे. बुधावरी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. अनिल देशमुख जेलमधून बाहेर येणार असले तरी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कडक अटी घातल्या आहेत. या अटींचे अनिल देशमुख यांना पालन करावे लागणार आहे(Bombay High Court imposed strict conditions). 

मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन (Bail) मंजूर केला होता. पण त्याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सीबीआयची याचिका मुंबई हायकोर्टानं ( Bombay High Court) फेटाळली आहे. सीबीआयला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे.  जामिनाला स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळल्याने अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांवर कडक अटी लादल्या

अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी त्यांच्यावर बंधनं असणार आहेत. देशमुखांना विनापरवानगी मुंबईबाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामिनात घातलेल्या अटीनुसार, देशमुखांना कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर  जाण्याकरता परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. मुंबईतील राहतं घर वगळता इतरत्र राहायला त्यांना मनाई करण्यात आली आहे. यामुळे देशमुख नागपुरातील आपल्या घरी, तसंच विधीमंडळ अधिवेशनात जाण्याची शक्यता नाही. 

कुठलाही गुन्हा नसताना अशा प्रकारे जेलमध्ये टाकणं म्हणजे मोगलाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झालाय. नेत्यांच्या अटकेच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक सरकारवर जोरदार निशाणा साधला. कुठलाही गुन्हा नसताना अशा प्रकारे जेलमध्ये टाकणं म्हणजे मोगलाई असल्याचा प्रकार आहे असं म्हणत अजित पवारांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही अशा कारवाया नैतिकतेला धरून नाही असं म्हटलंय. 

अनिल देशमुखांवर नेमके आरोप कोणते ?

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. या प्रकरणी देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी केली. 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.  9 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले होते.