Russian YouTubers Arrested in India : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे. त्यामुळे अशावेळी अनेक तरूण आपल्या जीवाचा विचार न करता खतरनाक व्हिडीओज शूट (Video Shoot) करण्याच्या तयारीत असतात. कधी ते असा व्हिडीओ करण्यात यशस्वी होतात तर कधी त्यांना अपयशही येतं. कित्येकदा असे व्हिडीओज बनवणं हे अनेकांच्या जीवावरही बेतलं आहे. तेव्हा अशांची काळजी घेणे त्यांच्या पालकांची जबाबदारी बनते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या ताडदेव परिसरातील एम्पेरिअल टॉवर्स (Emperial Towers) येथे 60 मजल्यांच्या इमारतीत दोन रशियन तरूणांना सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी भयानक स्टंटबादी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर पोलिसांना कारवाई केली आहे. (mumbai crime two russian youtubers arrested for making stunt video inside 60 storey imperial towers)
मुंबईत पसिद्ध इम्पेरियल टॉवर्सच्या (Imperial Towers) उंच मजल्यावर दोन रशियन तरूणांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा घडलेला प्रकार पाहून ताडदेव पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. एम्पेरियल टॉवर्स हे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध टॉवर्स आहेत. येथील कॉम्पलेक्समध्ये या दोन तरूणांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी गेलेल्या दोन रशियन यूट्यूबर्सना (Russian YouTubers) ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे . टॉवरच्या 58 व्या मजल्यावर पायऱ्यांवर हे दोन तरूण धावले आणि बाहेरून खाली येऊन स्टंट करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा त्यांचा हेतू होता. इमारतीतील सुरक्षा रक्षकांच्या हे निदर्शनास येताच त्याने ताडदेव पोलिसांना माहिती देऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांना वेळीच पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
या दोन रशियन पकडण्यासाठी अडीच तासांच्या प्रचंड नाट्यमय घडामोडी देखील यावेळी घडल्या यावेळी इमारतीत मधील नागरिकांमध्ये प्रचंड गोधळ निर्माण झाला होता. दोघांना अटक केल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे यांच्या गुन्हा नोंदवला आहे. अटक करण्यात (Police Arrested Two Russian Youtubers) आलेल्या रोमन प्रोशिन, मॅक्सीम शचेर्बकोव असे नाव आहे. याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक शेंडे याच्या कडून अधिक तपास केला जात आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी रशियन दुतावसाला माहिती दिल्याचे कळते आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 452 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आज दोन्ही आरोपींना गिरगाव न्यायालयात हजर करणार आहेत.