'असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती?' आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंना सुनावलं

प्रकाश सुर्वेंच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी सभागृहाबाहेर सुनावलं, पाहा व्हिडीओ

Updated: Jul 4, 2022, 04:48 PM IST
 'असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती?' आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंना सुनावलं title=

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अखेर सत्तांतराच्या टप्प्यावर येऊन ठेपला. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावात एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या युतीनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या ठरावानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदृश्य लोकांनी हा विश्वासदर्शक ठराव पास व्हावा यासाठी मदत केल्यानं त्यांचे आभार मानले. 

दुसरीकडे आदित्य ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला उशिरा पोहोचल्याने त्यांना विधीमंडळात घेतलं नाही. आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वे यांची विधिमंडळाबाहेर भेट झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी बोलूनही दाखवलं.

'काय सांगणार आपण मतदारसंघाला त्या दिवशी जेवण ठेवलं होते. आम्ही तुमच्याकडे येत होतो. असं कराल हे अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरंच प्रेम होतं. बघा विचार करा. माझं तुमच्यावर प्रेम होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. '

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांची सभागृहाबाहेर भेट झाली. आदित्य ठाकरेंनी आमदार प्रकाश सुर्वेना सुनावलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी सुर्वेंवर नाराजी दर्शवली. असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती अशा भाषेत आदित्य यांनी नाराजी व्यक्त केली.