मुंबई : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला (Devendra Fadnavis) मुंबईतल्या (Mumbai Metro) आरेच्या जागेचा मेट्रो कारशेड (Aarey Metro Car Shed) सोबतच व्यावसायिक कारणासाठी (commercial purposes) उपयोग करायचा होता, असा थेट आरोप, काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला. २०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड ((Aarey Metro Car Shed) व्हावी, अशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले. तर काल भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा त्यांनी सांगितले.
तत्कालीन फडणवीस सरकारला मुंबईतल्या आरेच्या जागेचा, मेट्रो कारशेड सोबतच व्यावसायिक कारणासाठी उपयोग करायचा होता असा आरोप करणारे सावंत बालीश आरोप करत आहेत, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे. स्वतःच्या अहंकारापोटी मुंबईकरांच्या चार हजार कोटींचा चुराडा हे तीन पक्षाचे सरकार करत आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे. एक इंच मेट्रोचे काम पुढे सरकरलेले नाही, असे ते म्हणाले.
भाजपा सतत खोट बोलत आहे. भाजपचे आशिष शेलार यांचे कालचे पत्र हास्यास्पद आहे. मला त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचे नाही. फडणवीस म्हणतात आरेमध्ये कारशेडसाठी ४०० कोटी वाया गेले. पण आरटीआयमधून माहिती काढली तर तो आकडा ६९ कोटी आहे. मग त्यांचा दावा किती खोटा आहे, हे स्पष्ट होत आहे. कारण व्यावसायिक कारणासाठी आरेवर फडणवीस सरकारचा डोळा होता, हे आता स्पष्ट होत आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
Hence it was decided by Fadnavis govt to take project to Aarey and hence lies were spread. Salt department has given land to MCGM for dumping ground and also was ready for affordable housing project then why not car depot? But now there is no need for salt dept's land
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 6, 2020