धक्कादायक! महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

Updated: Nov 19, 2019, 02:38 PM IST
धक्कादायक! महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या title=
संग्रहित फोटो

मुंबई : मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतरही सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलंय. १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत मराठवाड्यात तब्बल ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं बोललं जातं आहे. गेल्या १० महिन्यांमध्ये मराठवाड्यात ७४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जालना जिल्ह्यात ६ शेतकरी, परभणी जिल्ह्यात ११ तर हिंगोलीत ४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अवकळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पिक वाया गेलं आहे. नांदेड जिल्ह्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये ७, उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

  

नुकसानग्रस्तांसाठी राज्यपालांनी मदतीची घोषणा केली आहे. मात्र, ही मदत लवकरात लवकर मिळावी एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.