मुंबई : एक चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात नव्या कोरोना स्ट्रेनग्रस्तांची (New Strain) संख्या वाढली आहे. नव्या कोरोनाचे देशात 58 रूग्ण आहेत. पुणे एनआयव्हीत 20 नव्या केसेसचा उलगडा झाला आहे. नव्या (New Strain) कोरोनाचा (Coronavirus) देशात फैलाव वाढत आहे. मुंबईतही नव्या कोरोनाचे रुग्ण ( Corona New Strain) आढळून आले आहेत. मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
ब्रिटनमधून आलेल्या पाच जणांना नवा कोरोना झाला होता. हा नवा कोरोना सुपरस्प्रेडर असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या रिपोर्टकडे लक्ष होते. पण या ४० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला मिळाला आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे नवा कोरोना झालेल्या पाच जणांपैकीही दोन जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेत.
दरम्यान, ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत आणि एनआयव्ही पुणे लॅबमध्ये 20 नवीन घटना समोर आल्या आहेत. यानंतर, भारतातील नवीन कोरोना स्ट्रेनची (New Corona Strain in India) संख्या 58 वर पोहोचली आहे.
भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.32 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 29,091 रूग्ण बरे झाले, त्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या 99,75,958 झाली. देशात बरे होण्याचा दर 96.32 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर मृत्यूचा दर 1.45 टक्क्यांवर आहे. देशात कोविड-19चे 2.31,036 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) 16375 नवीन रुग्ण आढळले आणि 201 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर, संक्रमित होणा ऱ्यांची एकूण संख्या 1,03,56,844 वर पोहोचली, तर देशभरात आतापर्यंत 1,49,850 लोक मरण पावले आहेत.
345 6\