मुंबई : राज्यात आज दिवसभरात 2553 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 109 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवसांत 1661 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 40 हजार 975 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या महाराष्ट्रात 44 हजार 374 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 88 हजार 528 इतकी झाली आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 3169 जण दगावले आहेत.
2553 fresh cases of #COVID19 & 109 deaths recorded in Maharashtra today, taking total number of cases to 88,528 & death toll to 3169. Number of active cases stands at 44374: Maharashtra Health Department pic.twitter.com/uYsafwyYUw
— ANI (@ANI) June 8, 2020
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 85 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 1702 जणांचा बळी गेला आहे. तर 22032 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
ठाण्यात 13528, पालघर 1567, रायगड 1461, नाशिक 1592, जळगाव 1081, पुणे 9877, सोलापूर 1419, सातारा 640, सांगली 170, सिंधुदुर्ग 113, रत्नागिरी 371, औरंगाबादमध्ये 2036, नागपूरमध्ये 761, अकोला 834, धुळे 261 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तर गडचिरोली 44, चंद्रपूर 42, गोंदिया 68, भंडारा 41, वर्धा 11, वाशिम 10, बीड 56, परभणी 78, बुलढाणा 87, यवतमाळमध्ये 163, नांदेड 170, जालन्यात 208 कोरोनाबाधित सापडले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं असून रिकव्हरी रेट 46.28 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.57 टक्के आहे.