मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ आली असतांना आता राज्य शासनाकडून विविध निर्णायांचा धडाका लावलेला बघायला मिळत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 25 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विनाअनुदानित शाळा महाविद्यालये यांबाबत निर्णय घेत हा विषय कायमस्वरूपी राज्यातून संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. बुलडाणा जिल्यातील जिगाव प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, शासकीय आश्रम शाळांमध्ये इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
याधीच्या मंत्रिमंडळ बैठकीतही असेच एकूण 19 निर्णय घेण्यात आले होते. आता फडणवीस सरकारच्या शेवटच्या किमान 2 मंत्रिमंडळ बैठका होणे अपेक्षित असून या बैठकीत आणखी असेच भरमसाठ निर्णय होण्याची शक्यता आहे.