महाराष्ट्रात दीड लाख परवडणारी घरं उभारण्याची घोषणा

पंतप्रधान शहरी आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं उभारण्यात येणार आहेत.

Updated: Aug 28, 2017, 10:58 PM IST
महाराष्ट्रात दीड लाख परवडणारी घरं उभारण्याची घोषणा title=

मुंबई : महाराष्ट्रात दीड लाख परवडणारी घरं उभारण्याची घोषणा केंद्रीय नगरविकास खात्यानं केलीय, राज्यातल्या शहरांमध्ये १ लाख ४४ लाख १६५ परवडणारी घरं उभारण्यात येणार आहेत. 

पंतप्रधान शहरी आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं उभारण्यात येणार आहेत.

 या प्रकल्पासाठी १५ हजार ८६८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून केंद्र सरकार २ हजार २४४ कोटी रूपयांचा भार उचलणार आहे. 

शिवाय पंतप्रधान योजनेतून या आधीच काही अनुदान देखील सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र यासाठी काही अटी व नियम आहेत. यात तुम्ही नव्याने विकत घेतलेलं घर असावं, शिवाय मर्यादीत किंमत असावी.