सिद्धार्थ माल्याच्या लग्नात कोणी दिलं 'कामसू्त्र पुस्तक' भेट? सांगितलं त्या व्यक्तीचं नाव

Sidharth-Jasmine च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वत: सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शिवाय त्याने लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही शेअर केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 27, 2024, 07:17 PM IST
सिद्धार्थ माल्याच्या लग्नात कोणी दिलं 'कामसू्त्र पुस्तक' भेट? सांगितलं त्या व्यक्तीचं नाव title=

Sidharth-Jasmine Wedding : फरार उद्योगपती विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याने त्याची गर्लफ्रेंड जस्मिनसोबत लग्न केलं. हा विवाहसोहळा विजय मल्ल्याच्या ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर इस्टेटमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला. सिद्धार्थ-जस्मिनच्या (Sidharth-Jasmine Wedding) लग्नाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याशिवाय सिद्धार्थने स्वत: ही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाच्या फोटोबरोबरच त्याला लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोबरोबर सिद्धार्थने आपल्या मिळालेली सर्वात सुंदर भेट असल्याचं त्याने म्हटलंय. ही भेट आहे कामसूत्र (Kamasutra) पुस्तक. सिद्धार्थ माल्याचे वडील विजय माल्याच्या एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या तुषिता पटेल हीने हे पुस्तक भेट दिलंय. सिद्धार्थ माल्याने केलेली पोस्ट तुषिता पटेलने रि पोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आपल्या आवडत्या मुलाचं जेव्हा लग्न होतं, मी त्याला एक युजर मॅन्युअल पाठवलं आहे' असं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

लग्नात जगभरातील श्रीमंत व्यक्ती सहभागी
विजय मल्ल्या हा 900 कोटींहून अधिक रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आहे,  ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून त्याची चौकशी केली जात आहे आणि तो सध्या ब्रिटनमध्ये आहे. मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात जगभरातून श्रीमंत लोक पाहुणे म्हणून आले होते.

सिद्धार्थ आणि जस्मीच्या लग्नात आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि फरार ललित मोदीही सहभागी झाला होता. याशिवाय बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मझूमदार-शॉ, अॅडव्हरटाईजिंग फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ आणि त्यांची पत्नी आरती, दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेल, फॅशन डिझायनर मनोविराच खोसला सहभागी झाले होते.