औरंगजेबाला 'या' देवीपुढे का मागावी लागली माफी? नेमकं कुठे आहे हे मंदिर?

Jeen Mata Mandir Sikar: औरंगजेबाने एका देवीच्या मंदिरात माफी मागितली होती. त्यानंतर देवीला सव्वा मण तेलदेखील देण्याचे वचन दिले होते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 27, 2024, 06:17 PM IST
औरंगजेबाला 'या' देवीपुढे का मागावी लागली माफी? नेमकं कुठे आहे हे मंदिर? title=
jeen Mata Temple rajasthan where mughal emperor Aurangzeb apologize

Jeen Mata Mandir Sikar: मुगल भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीयांना तर गुलाम बनवलेच पण भारतातील अनेक प्राचीन मंदिरे तोडली. अजूनही याबाबत कोर्टात केस चालु आहेत. मात्र एक घटना अशी घडली आहे की, मुगल बादशहा हिंदू देवस्थाने उद्ध्वस्त करण्यास सफल झाला नाही. काही प्रकरणात दैवी शक्तींच्या पुढे नतमस्तक होण्यास मजबूर झाला. औरंगजेब हा मुगल बादशहा आहे. राजस्थानातील एका देवीचे मंदिर तोडण्याचा प्रयत्न औरंगजेबाला खूप महागात पडला होता. 

राजस्थानातील सीकर येथील जीण मातेचे मंदिराबाबत अशी एक अख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर तोडण्यासाठी औरंगजेबाने अनेक प्रयत्न केले. अन्य मंदिर तोडत असताना औरंगजेब जीण मातेच्या मंदिरासमोर आला आणि त्याने देवीचे मंदिर तोडण्याचे आदेश दिले. तितक्यात तिथे असलेल्या मधमाश्यांनी औरंगजेबावर आणि त्यांच्या सेनेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात औरंगजेब गंभीर जखमी झाला होता. तर, त्याची सेनादेखील यात जखमी झाली होती. कसंबसं करुन त्यांनी तिथून पळ काढला.

औरंगजेबाच्या सेनेचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर औरंगजेबाने मंदिराची शक्ती स्वीकारली आणि येथे माफी मागण्यासाठी देखील आला होता. मुगल बादशाह औरंगजेबाने जीण मातेच्या दरबारात डोकं टेकवून माफी मागीतली आणि अखंड दिव्यासाठी देवीला दर महिन्याला दीड मण तुपाचे तेल भेट देण्याचे वचन दिले. 

प्रत्येक महिनाला दिव्यासाठी तेल पाठवायचा औरंगजेब

मंदिरात दर्शन करुन आल्यानंतर आणि देवीची माफी मागितल्यानंतर औरंगजेबाची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. त्यानंतर त्याने दर महिन्याला मंदिरात सव्वा मण तेल पाठवण्याचे वचनाची पूर्तता केली. राजा बदलल्यानंतरही मंदिरात तूप आणि तेलाचे पैसे यायचे. जीण माता मंदिर सीकरपासून 35 किमी दूर  असलेल्या अरावलीच्या घाटात हे मंदिर वसलेले आहे. तेच जयपूर ते जीण माता मंदिराचे अंतर सव्वाशे किलोमीटर इतके आहे. 

दरम्यान, जीण माता आणि औरंगजेबाची ही अख्यायिका संपूर्ण राजस्थानात लोकप्रिय आहेत. मुगल बादशाहदेखील देवीच्या प्रकोपाला घाबरला होता. देवीला घाबरुन देवीचे मंदिर न उद्ध्वस्त करता तो पराभूत होऊन परतला होता. तसंच, देवीच्या मंदिरात येऊन माफीदेखील मागितली होती. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)