Prabhas Kalki 2898 AD Shows Cancelled : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकंच नाही तर प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत आहे. त्याची आगाऊ बूकिंग देखील सुरु झाली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून थिएटर मालकांवर प्रेक्षक संतापले आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका नेटकऱ्यानं म्हटलं की पुण्यात 'कल्कि 2898 एडी' चा सिनेपोलिस आयमॅक्समध्ये असलेला शो काही कारण न सांगता कॅन्सल करण्यात आला. व्हिडीओत एक व्यक्ती मॅनेजरशी बोलताना दिसत आहे. त्यात ती व्यक्ती बोलताना दिसते की त्यानं चित्रपट पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी तिकिट बूक केलं होतं आणि आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आयमॅक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलो. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती हे देखील सांगत आहे की त्याला परत ऑफिसला जाऊन काम सुरु करायचं आहे. त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या गैरसोईसाठी भरपाई द्यायला हवी.
Another video. Cinepolis are not helping for our wasted time. Conversation between Cinepolis owner and normal audience.#KALKI2898AD #Kalki2898ADbooking #KALKI #kalki2898 https://t.co/0tkqTN16lF pic.twitter.com/CO7kUMxHy7
— Pavan Khedkar (@khedkarpavan07) June 27, 2024
अनेक आयमॅक्श थिएटरमध्ये 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल होण्याचं कारण त्यांच्यापर्यंत चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे केडीएम (KDM) पोहोचले नाही. त्यामुळे त्यांना शो कॅन्सल करावे लागले. अखेर त्यांना प्रेक्षकांचे पैसे परत देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.दरम्यान, ती व्यक्ती सांगताना दिसते की सिनेपोलिसनं आधीही असं केलं आहे. त्यांनी ठग्स ऑफ हिंदोस्तान, ब्रह्मास्त्र: भाग 1 आणि सलारचे शो कॅन्सल केले.
या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांसोबत बॉलिवूड कलाकार देखील आहेत. त्यामुळे देखील चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या रिव्ह्यू विषयी बोलायचे झाले तर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हिज्युअल आणि सेट-अप अशा प्रकारे करण्यात आलं आहे, जो भारतीय चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेला नाही. चित्रपटाची पटकथा देखील तितकीच हटके आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले अशी आहे. प्रभाससोबत दीपिका पादुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. राजेंद्र प्रसाद, पसुपति, शाश्वत चटर्जी, अन्ना बेन आणि चेम्बन विनोद जोसनं देखील भूमिका साकरली आहे. तर विजय देवरकोंडा आणि दुलकर सलमानची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे.