मुंबई : कोणतेही नाते हे विश्वासावर आधारलेले असते. विशेषतः पती-पत्नीचे नात्यात तर विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. तो जर तुटला तर नात्यातही दुरावा येतो किंवा नाते तुटते.
मुंबईत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला आपल्या नवऱ्यावर संशय होता की त्याचे दूसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. मात्र खरे कळल्यावर तिच्या पायाखालची जमिनच सरकली.
श्वेता सिंग या महिलेला आपल्या पतीवर संशय होता. त्याचे बाहेर अफेअर असल्याचे तिला वाटत होते. शंकेचे निरसन करण्यासाठी ती पुरावे शोधत होती. म्हणून तिने तिच्या पतीच्या मोबाईमध्ये एक रिकॉर्डिंग अॅप डाऊनलोड केला. यामुळे तिला कळले की तिच्या पतीने कोणावरतरी बलात्कार केला आहे.
श्वेता सिंग या महिलेचा पती मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. क्लबमध्ये त्याची ओळख एका महिलेशी झाली. दोघांनी तिथे मद्यपान केले. त्यानंतर महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने तो तिच्या घरी गेला. तिथे संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार केला. हे कळल्यानंतर श्वेता त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तयार झाली आहे.