बीड : नशेत व्यक्ती अमानुषपणाचे कोणते टोक गाठेल हे सांगता येत नाही. बीडमध्ये पोटच्या मुलाने दारूच्या नशेत जे केलं त्यामुळे तुमचं मन सुन्न होईल. मदन पांडुरंग मानगिरे या मुलाने आपल्याच आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून जाणार्या मुलाला दिड तास पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेतले.
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे असे मयत महिलेच नाव आहे. दारुच्या नशेत मुलगा मदन पांडुरंग मानगिरे याने आई प्रयागबाई यांना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मारहाण केली.
यामध्ये प्रयागबाई यांचा मृत्यू झाला. रात्री केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे, ही बाब शनिवारी सकाळी पांडुरंगच्या लक्षात येताच त्याने घरातून पळ काढला. बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहचला.
तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता, याची माहिती नेकनूर पोलीस यांना मिळताच त्यांनी शहागड येथून संशयित आरोपी पांडूरंग यास ताब्यात घेतले. तसेच एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे.