Sharad Pawar On His Lie As Chief Minister: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये शुक्रवारी आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये एक मोठा दावा केला आहे. मुंबईमधील बॉम्बस्फोटांचा उल्लेख करताना शरद पवारांनी आपण खोटं बोलल्याने त्यावेळेस मुंबई शांत राहिल्याचं नमूद केलं. पवारांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीच्या प्रकाशनसोहळ्यामध्ये त्याने अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी स्वत: दिलेल्या या खोट्या माहितीबद्दलही खुलासा केला. भारतीय लष्करामध्ये महिलांचा प्रवेश कसा झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देतानाचा किस्साही शरद पवारांनी सांगितला.
छत्रपती संभाजी नगरमधील हज हाऊस येथे शुक्रवारी शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. डॉ. मकदूम फारुकी यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळेस शरद पवारांनी त्यांच्या कारकिर्दीमधील महत्त्वाच्या घटनाक्रमांवर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेचाही उल्लेख केला.
मुंबईमधील बॉम्बस्फोटासंदर्भात बोलताना शरद पवारांनी, "कराचीमधून आरडीएक्स आला असेल, शेजारील देशाचा कट असेल. तो बॉम्बस्पोट झाल्यानंतर मी टिव्हीवर आलो. खोटं सागितलं मुंबई शहरात मोहम्मद आली रोडवर अशी घटना घडली. दोन्ही समाजाला वाटलं ही हिंदू मुस्लीम दंगल नसून काही वेगळा प्रकार आहे. त्यामुळे तेव्हा मुंबई शांत राहिली," असा खुलासा केला.
नक्की वाचा >> 'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'
12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकूण 12 बॉम्बस्फोट झाले. एकामागोमाग एक झालेल्या या स्फोटांमध्ये एखूण 257 जणांनी प्राण गमावले. बाबरी पाडल्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या या बॉम्ब स्फोटांमागे नक्कीच पाकिस्तान कनेक्शन असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळेच अवघ्या सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदी नियुक्त झालेल्या शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना 12 बॉम्बस्फोटांऐवजी 13 बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं होतं. पवारांनी मशीद बंदर येथेही स्फोट झाल्याचं सांगितलं होतं. हे का केलं याचा खुलासा शरद पवारांनी केला.
नक्की वाचा >> 'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा
"मी अमेरिकेत गेलो, तेव्हा डिफेन्स मिनिस्टर होतो. मी विमानतळावरून पुढे गेलो तिथे सैनिकांनी सॅल्यूट केलं तेव्हा तिथले सैन्यातील त्या सैनिक मुली होत्या. तिथे सैनिक म्हणून सुरक्षेची जबाबदारी महिलांवर होती. मग हे भारतात का नको असा प्रश्न पडला. मी हे इथल्या अधिकाऱ्यांना बोललो ते म्हणाले हे शक्य नाही. मग एक महिन्यानंतर पुन्हा विषय काढला. तिसऱ्या वेळी त्यांचा निर्णय तोच होता. त्यावेळी मी सैन्याची जबाबदारी महिलांना दिली पाहजे असा निर्णय घेतला. आपल्या एअर फोर्समध्ये अपघात अधिक होतात. महिलांना सैन्यात संधी दिली त्यानंतर अपघात कमी झाले. सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं हे कसं झालं तर मी सांगितले, महिला या लक्षपूर्वक काम करतात. महिलांना आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल लोक सुरुवातीला नाराज होते. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. चांगलं काम करत आहेत.
नक्की वाचा >> 'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...'
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला खूप आव्हानं होती. त्यावेळी असलेले पोलीस आयुक्तांचे खूप मेसेज आले. अनेकांचे घर जळत आहे. निर्णय लोकांना मान्य नाही यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्या नावाने असलेलं विद्यापीठ का नको. त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचं निर्णय घेणं गरजेचं होतं," असंही शरद पवार म्हणाले.