अमर काणे / नागपूर : अंबाझरी तलावाच्या बंधा-यांच्या भिंतीचं बळकटीतकरण आणि सुरक्षिततेबाबत अनेक वर्षांपासून कागदी घोडे नाचवण्यात येत असल्याचं वृत्त 'झी २४ तास'ने दाखवले होते. याची गंभीर दखल घेत आज महापौर संदीप जोशी यांनी अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याच्या भींतीच्या सुरक्षेच्यादृष्टीने पाहणी केली. या परिसराजवळ नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने बांधकामादरम्यान उपसण्यात आलेला मलबा टाकल्याने तलावाचा परिसर आणि विवेकानंद स्मारक विद्रुप दिसू लागले आहे.
शिवाय हा मलबा तलावासाठी धोकादायक ठरु शकतो. हे लक्षात घेता मेट्रोने तातडीने मलबा हटवावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिलेत त्याचबरोबर येत्या 23 तारखेला महापालिका, मेट्रो प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांच्यासोबत बैठक बोलवून या तलावाच्या बंधा-याची भींतीच्या बळकटीकरणासाठी समन्वय करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
नागपुरच्या अंबाझरी तलाव्याच्या बंधा-याची भिंत,पाळीची बळकटीकरण न झाल्यामुळं मोठं नुकसानं होतंय.यथ्यापाशी असलेलं सिंमेट उखडून गेलं आहे. अंबाझरी तलावापासून सुमारे २२ किलोमीटर नागपूर शहरातून नागनदी जाते. त्यामुळे हा तलावाला आघात झाला तर नागपूर शहराला धोका निर्माण होवू शकतो. या तलावाच्या पाळीपाशी, भिंतीला लागून मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आलं आहे. त्यामुळं मेट्रो पिलरचं ओझ तलावाल लागून असल्याने त्यावेळेस मेट्रोने तलावाचे मजबूतीकरण करण्यात येणार निश्चित झाले होते. मात्र महामेट्रो आणि जलसंपदा विभाग या प्रलंबित कामाकडे दुर्लक्ष केले. आता याबाबत 'झी २४ तास'ने वृत्त दाखवल्यानंतर महापौरांनी याची गंभीर दखल घेतली.
महापौर संदीप जोशी यांनी आज अंबाझरी तलावाच्या विवेकानंद स्मारक ओव्हरफ्लो पॉईंट जवळील बंधाऱ्याची भिंतीचे निरीक्षण केले. हा फार जुना बंधारा असून भिंतीची अवस्था जीर्ण झाली आहे. अशात त्या बंधाऱ्याला तडा जाऊ नये, त्याला धोका पोहचू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. असे असतानाही मेट्रोने बांधकामादरम्यान निघालेली
माती तेथे टाकली. यावर नाराजी व्यक्त करीत ती माती तात्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले. बंधाऱ्याची अवस्था लक्षात घेता सिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती तात्काळ करावी, असेही निर्देश त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या महत्त्वाच्या विषयावर मेट्रो, सिंचन विभाग व मनपाची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.