तरूण पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर, राहणार राजगुरूनगर, खेड असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

Updated: Sep 17, 2017, 11:42 PM IST
तरूण पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू  title=

पुणे : एका पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामशेत येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या ‘वेट अँड जॉय वाटर पार्क’मध्ये पर्यटनासाठी हा तरूण आला होता.  ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर, राहणार राजगुरूनगर, खेड असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर यांना दुपारी दीडच्या सुमारास पाठीत चमक येवून उलटी होवून त्याचा मृत्यू झाला. त्यांचे शव विच्छदन केले असता त्यांचा हृदय विकाराच्या विकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळ मुंढावरे गावच्या हद्दीतील ‘वेट अँड जॉय वाटर पार्क’ येथे चाकण येथील महिंद्रा सी.आय.ई कंपनीतील एकूण ११ कर्मचारी मित्र फिरण्यासाठी आले होते.