भिवंडी : निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.
या निवडणुकीच्या उम्मेदवारीमध्ये एक सर्वात लहान म्हणजेच २३ वर्षीय आणि उच्चशिक्षित रिशीका राका ही काँग्रेसपक्षातून निवडून आली. भिवंडी महानगर पालिकेची उच्चशिक्षित अशी ही नगरसेविका झाली आहे.
रिशीका राका हिल वार्ड नंबर ६ ब मधून म्हणजेच मंडई , बाजारपेठमधून काँग्रेसकडून तिकीट मिळाले होते. रिशीका राका हिने एमकॉम केले असून ती आता LLM करत आहे. सध्या ती कन्सल्टंट म्ह्णून एका मोठ्या कंपनीत काम करत आहे. भारताबाहेर जेव्हा ही शिकायला गेली असता तिने पाहिले आहे की, कशी स्वछ व सुंदर शहर असतात.असेच एक शहर भिवंडी बनवायचे तेव्हाच तिने ठरवले. या विजयानंतर तरुणांनी राजकारणात उतरावे तरच आपल्या शहराची प्रगती होऊ शकते, असे आवाहन या तरुण नागरसेविकाने केले आहे.