नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या महापालिकेला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी महापालिका मुख्यालयाला भेट देण्याची महापलिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरलीय.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि पदाधिका-यांकडून महापालिकेच्या कामकाजाचं आढावा घेतला. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, गोदावरी संवर्धन या संदर्भात विशेष भर देण्यात आला.
स्मार्ट सिटीसाठी महापालिकेनं काम करावं. स्मार्ट सिटीच्या पहिल्या १० शहरांमध्ये नाशिक महापालिकेचा समावेश कसा होईल त्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. मात्र त्यांची समजूत काढण्याचं काम सुरु असल्याचं ते म्हणाले.