तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की..., धनंजय मुंडेंचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण

Updated: Jan 15, 2021, 03:52 PM IST
तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की..., धनंजय मुंडेंचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. करुन रेणू शर्मा (Renu Sharma)ने त्यांच्यावर  गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. रेणू शर्मावर आणखी काही लोकांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांनी याआधी फेसबुक पोस्ट लिहून आपली बाजू मांडली होती.

रेणू शर्माच्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे अडचणीत येतील असं वाटत असताना या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला. भाजप नेते यांच्या एन्ट्रीनंतर मुंडे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. शरद पवार यांनी देखील चौकशीनंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 

रेणू शर्मावर हनिट्रॅपचा आरोप होत आहे. काही जणांनी रेणू शर्मा विरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.

धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एक शायरीच्या माध्यमातून लोकांना साद घातली होती.