मुख्यमंत्र्यांना प्लास्टीकमध्ये गुंडाळून दिला बुके, कार्यकर्त्याला बसला दंड

औरंगाबादच्या मनपा आयुक्तांची कारवाई

Updated: Jan 10, 2020, 08:21 PM IST
मुख्यमंत्र्यांना प्लास्टीकमध्ये गुंडाळून दिला बुके, कार्यकर्त्याला बसला दंड title=

मुंबई : राज्यात प्लास्टीक बंदी असताना मुख्यमंत्र्यांना कार्यकर्त्यांकडून प्लास्टीकमध्ये गुंडाळून बुके दिला गेला आणि याचवेळी औरंगाबादचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांच्या ते निदर्शनास आलं आणि लागलीच त्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५०० रु. दंड ठोठावला. हे दोन्ही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटायला जालन्याहून आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मराठवाड्यात औरंगाबादेत आले होते, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला फुलांचे बुके आणले होते, त्यावेळी काही बुके मध्ये प्लास्टीक असल्याचं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या निदर्शनास आलं, त्यांनी लागलीच त्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड लावला, दोनही कार्यकर्ते जालानामधून मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते.

याआधी बीडचे येथून औरंगाबादला बदली झाली होती तेव्हा देखील त्यांनी एका अधिकाऱ्याला पाच हजाराचा दंड लावला होता. प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिकमध्ये असलेलं पुष्पगुच्छ आणल्यामुळे आस्तिक कुमार पांडे यांनी अधिकाऱ्याला पाच हजारांचा दंड ठोठावला होता.