सावधान...खान्देशात सोनू गँगचा धुमाकूळ, या सोनूवर अजिबात भरवसा ठेवू नका...

तुम्ही त्या मुलीला पाहिलात तर तुमचा विश्वासच बसणार नाही की, ही मुलगी असं काही करु शकते.

Updated: May 23, 2021, 05:28 PM IST
सावधान...खान्देशात सोनू गँगचा धुमाकूळ, या सोनूवर अजिबात भरवसा ठेवू नका... title=

नंदुरबार : महाराष्ट्रातील खानदेशामधील सोनू शिंदे नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या नावावर असा गुन्हा आहे जो ऐकून तुम्हाला वाटेल की, ही तर एखाद्या सिनेमातील कहाणी आहे. पण ही खरीखुरी कहाणी आहे. तेव्हा ही सोनू जर तुम्हाला भेटली तॉॉ आणि म्हणाली की, तुमचा सोनूवर भरोसा नाही का, तर सरळ नाहीच सांगून टाका आणि निघा नाहीतर खूप महाग हळद तुम्हाला लागेल, कशी ते ही बातमी वाचल्यावर तुम्हाला कळेल.

सोनू शिंदे या महिलेने 13 मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. ती रिती रिवाजा प्रमाने संपूर्ण लग्नाच्या विधी पार पाडते आणि मग पैसे आणि दागिने घेऊन पळून जाते. परंतु हे सगळ काम ती एकटी करत नाही. तर यामागे तिची टोळी देखील आहे. परंतु ते किती ही हुशार असले तरी ते, पोलिसांच्या हाती लागलेच.

जर तुम्ही त्या मुलीला पाहिलात तर तुमचा विश्वासच बसणार नाही की, ही मुलगी असं काही करु शकते. पण सोनू शिंदे हिचं सौंदर्य असे आहे की, ते 13 ही तरुण तिच्या सौंदर्याला भूलले.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

सोनू शिंदे आणि तिची टोळी ही हिंगोली आणि अकोल्याती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही टोळी वेगवेगळ्या शहरांमधील दलालांमार्फत वेगवेगळ्या तरुणांशी लग्न करण्यासाठी मदत घेते. यावेळी त्यांनी नंदुरबारमधील एका कुटुंबाला अडकवले आणि यामध्ये सोनू शिंदेला औरंगाबादमधील एका दलालाने मदत केली.

नंदुरबारच्या कुटूंबाला फसवले

सोनू शिंदेने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंडणे भागातील एका तरूणाशी दोन आठवड्यांपूर्वी लग्न केले होते. त्यावेळी लग्नासाठी वधूच्या बाजूने काही लाख रुपयांची मागणी ठेवण्यात आली. वराच्या घरातल्यांनी त्यांची ही मागणी मुलाच्या प्रेमासाठी माण्य केले. पण लग्नानंतर सोनू शिंदे पळून गेली.

सोनू शिंदेच्या टोळीविरोधात तक्रार दाखल

जेव्हा नवीन वधू अचानक घरातून पळून गेली तेव्हा स्वाभाविक कुटुंबातील लोकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या घरा जवळील पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर त्वरित पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी तपास कसा सुरू केला?

तपास करताना पोलिसांना एक महत्वाची माहिती हाती लागली. पोलिसांना कळले की, सोनू शिंदेची ही टोळी आता शिंदाखेडा तालुक्यातील एका तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवणार आहे. परंतु सोनू शिंदेच्या टोळीलाही खबर मिळाली की, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. तसे लगेचच सोनूच्या टोळीने लग्नाचे ठिकाणं बदलले. तेव्हा अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु पोलिसांनाही हे नवीन ठिकाण कळलेच.

लग्नाच्या सगळ्या विधीला सुरवात झाली, परंतु फेरे घेण्यापूर्वीच लग्नाच्या मंडपाजवळ पोलिस पोहोचले आणि सोनू शिंदे आणि तिची टोळी पकडली गेली. परंतु या टोळीमधील सोनूची आई आणि भाऊ बचावले, पण वधू सोनू पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांच्या या कारवाईला जर उशीर झाला असता तर आणखी एक कुटुंब सोनूच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकले असते.

सोनू शिंदे आणि तिच्या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक लोकांशी लग्न करून पैसे लूटले आहे. पोलिसांनी त्यांना पकडून जिल्ह्यातील आणखी तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बळी पडण्यापासून वाचले आहेत.