नांदेड : पिकविमा भरतांना गर्दीमुळे झालेल्या गोंधळात एका महिला शेतकऱ्यांचे डोके फुटले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड मध्ये ही घटना घडली. पिकविमा भरण्यासाठी मुखेड च्या एसबीआय बैंके समोर शेतकऱ्यांची मोठी रांग आहे. भल्या पहाटेपासुन शेकडो शेतकरी बँकेसमोर रांगेत ताटकळत आहेत.
महिला शेतक-यांची संख्याही मोठी असल्याने बैंकसमोर महिला आणि पुरुष अशी रांग लावण्यात आली होती. बँकेच्या गेटसमोर रेटारेटी होऊन मोठा गोंधळ उडाला. त्यात एक शेतकरी गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतांना त्याला एकाने विटकर फेकुन मारण्याचा प्रयत्न केला. पण विटकर चुकुन महिला शेतक-याच्या डोक्यात लागली. यात महिलेचे डोके फुटुन मोठा रक्तस्त्राव झाला.
पद्मीनबाई पोटफोडे असं महिला शेतका-याच नाव आहे. ती मुखेड तालुक्यातील खैरका येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. या महिलेला काही युवकांनी मुखेड च्या शासकीय रुग्णलयात दाखल केले. सध्या महिलेची प्रक्रुती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
पिकविमा भरण्यासाठी प्रचंड गोंधळाची स्थीती निर्माण झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. पण प्रशासनाने कुठलयही उपाययोजना अजुन केल्या नाहीत त्यामुळे पिकविमा भरण्यासाठीही बळीराजाला अनंत अडचणीचा सामना करावा लागतोय.