पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण ९५ टक्के भरलंय. लोणावळा परिसरात तसंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होतेय. त्यामुळे धरणाचे ४ दरवाजे अर्ध्या फुटानं उचलण्यात आलेत. त्यातून १३६२ क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त मागील तीन दिवसांपासून धरणाच्या हॅड्रोगेटमधून २४ तास १४०० क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातून पवना नदीमध्ये एकूण 2762 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पवना नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.