उल्हासनगर : सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेक महिलांना लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या महिलेला पोलिसांना अटक केली आहे. या महिलेच्या विरोधात कल्याण आणि उल्हासनगरमध्ये फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथिल डाँल्फिन क्लब परिसरात राहणारी पूजा खरात हिची ओळख किरण दिलीप फुंदे या महिलेशी काही दिवसांपूर्वी झाली होती. पूजा हि बेरोजगार असल्याचे पाहून किरण दिलीप फुंदे ह्या महिलेने तिला कलेक्टर आँफीसमध्ये झाडुवालीची नोकरी लावून देते असे आमिष देऊन तिच्याकडून ७५ हजार रुपये घेतले होते.
अनेक दिवस झाले तरी किरण दिलीप फुंदे ही पूजाला कोणत्याही प्रकारची नोकरी लावून देत नव्हती. त्यानंतर पूजाने किरण फुंदे या महिलेकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. पूजा सतत पैशाची मागणी करत असल्याने किरणने पूजाच्या वडिल्याच्या नावे कार्परेशन बँकेचा धनादेश तिला दिला. मात्र तो धनादेश पूजाने बँकेत टाकला असता तो बांउन्स झाला. त्यानंतर पूजाला समजले कि माझ्या प्रमाणे अनेक जणाची किरण दिलीप फुंदे या महिलेने नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्यानंतर पूजाने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठुन किरण हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिसांनी किरण फुंदे या महिलेस वरपगाव येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सदर महिलेस न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर आरोपी महिला ही पोलीस रेकॉर्डमधील सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. तिच्यावर कल्याण आणि उल्हासनगरमध्ये विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहे. नागरिकांने अशा लोकांकडून सावध राहण्याची गरज असल्याचं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं आहे.