महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार! नारायण राणे यांचा दावा

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे

Updated: Aug 27, 2021, 04:35 PM IST
महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार! नारायण राणे यांचा दावा title=

रत्नागिरी : आगामी निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, भविष्यात महाराष्ट्रात आमच सरकार येणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रा आजपासुन रत्नागिरीत सुरु झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. 

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं सांगतानाच आम्ही केंद्रात सत्तेत आहोत, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. 

भविष्यात भाजप-शिवसेना युती झाली तर काय? या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे यांनी युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल असं स्पष्ट केलं. 

सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं ते म्हणाले.

राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय, सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही.  मी क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? तेव्हा विरोध का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले.