खरंच 18 डिसेंबरला भुजबळ तुरूंगाबाहेर येतील ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात आहेत.

Updated: Dec 9, 2017, 09:43 PM IST
खरंच 18 डिसेंबरला भुजबळ तुरूंगाबाहेर येतील ? title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात आहेत.

18 डिसेंबरला निर्णय

येत्या 18 डिसेंबरला भुजबळांच्या जामिनावर निर्णय होणार आहे. यापूर्वी विशेष न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉड्रिंग अॅक्ट मधील कलम 45 घटनाबाह्य ठरविल्याने भुजबळांनी परत एकदा जामिनासाठी अर्ज केलाय. 

ईडीचा विरोध

ईडीचा मात्र या जामिनाला विरोध आहे. भुजबळ कारागृहात असतानासुद्धा माफीच्या साक्षीदारांना धमकावलं गेलय. ते तुरूंगाबाहेर आले तर काय होईल असा युक्तिवाद ईडीच्या वकीलांनी केला.

सोय आणि गैरसोय

यानिमित्ताने गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ तुरूंगात असलेले  छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ तुरूंगाबाहेर येणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. भुजबळांचं तुरूंगाबाहेर येणं किती लोकांना सोयीचं आणि किती जणांना गैरसोयीचं यावरही चर्चा रंगल्यात.