अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

Pravin Dabholkar | Updated: Aug 24, 2023, 03:44 PM IST
अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले  title=

Position of Ajit Pawar in NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे अजित पवार यांचा वेगळा गट झाल्याचे पाहतो आणि दुसरीकडे चोरडीयांच्या घरी एकत्र बैठकीला बसतो. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होतेय का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली.चोरडीया आणि पवार कुटुंबीयांचे आमच्या जन्माच्या आधीपासून संबंध आहेत. त्यांच्या घरी आम्हाला बोलावले तर आम्ही आजही जाऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांसोबत गेलेले म्हणतात सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकरणी देखील जाहीर होतात. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अशा कोणत्या प्रक्रियेबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भाजपसोबत कोणतीच युती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

अजित पवार यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सध्याचे स्थान काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली आहे. त्या विरोधात आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दिली आहे, असे उत्तर देत त्यांनी हा विषय संपवला. 

Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या

फडणवीसांना टोला 

मी फडणवीस यांच्या जागी असते तर मला वाईट वाटल असत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 105 लोकं निवडूण अणायचे आणि उप मुख्यमंत्री व्हायचं. मी त्यांच्यावर आता कधीचं बोलणार नाही.
त्यांच्या पक्षाने त्यांचा अपमान केलाय, असे ते यावेळी म्हणाल्या. 

राज्यतील नव्या सरकारमध्ये समन्वय नाही. कशाला कशाचा मेळ नाहीकुणी कुठले निर्णय घेत आहेत तेच कळत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

राज्यातील दुष्काळग्रस्तांसदर्भातमी मुख्यमंत्री आणि दोन्हीं उप मुख्यमंत्री याना पत्र पाठवलं आहे. अनेक ठिकाणीं पाणी नाही. राज्यसरकारने श्रेयवादासाठी काम कारण बंद करावे आणि याचा आढावा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

दिलीप वळसे पाटील यांच्या पवारांवरील विधानावरही त्यांनी भाष्य केले. पवार साहेब ४ वेळा मुख्यमंत्री झाले. पक्षाची स्थापना झाल्यापासुन पवार साहेबांनी एकदाही विधानसभा निवडणुक लढवल्या नाहीत. इंडिया आघडीतल सगळे लोक आजही पवार साहेबाना नेता मानतात. आमदार त्यांच्या नेतृत्वात निवडूण येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात एक नंबरला होता, असे त्यांनी सांगितले.