तुषार तपासे, रविंद्र कांबळे, झी मीडिया, सातारा/ सांगली : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराचा ऊस उत्पादकांना मोठा फटका बसलाय... शेती पाण्यात गेलीच आहे, पण पेरणीही लांबणार आहे. याचा फटका साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. शेकडो एकर उस पाण्यात गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेक दिवस पाण्यात बुडालेल्या पाऊस उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे साखर कारखानदारीवर सुद्धा परिणाम होणार आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यास बसलेल्या महापुराच्या जबर तडाख्याने आडसाली तसेच पूर्वहंगामी ऊस लावणी लांबणीवर पडल्या आहेत. याचा फटका आगामी दोन गळीत हंगामात या तिन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना अपुरा ऊस, साखर उतायात घट आणि ऊस उत्पादकाच्या एकरी उत्पादनात घट या रुपाने बसणार आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा पलूस आणि मिरज तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यात 41 हजार हेक्टर शेत्रावरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. यात ऊस शेतीला फार मोठा फटका बसला आहे.
पलूस तालुक्यातील शेतकरी बाळासाहेब अण्णासो मिठारी यांची ऊस शेती पूर्णपणे कृष्णानदीच्या महापुराच्या पाण्यात बुडाली. मिठारी बंधूंची पन्नास एकर शेती असून त्यातील 35 एकरावर असणाऱ्या उसाच्या संपूर्ण फडात पुराचे पाणी गेलं. महापूर जरी ओसरला असला तरी या शेतात अजूनही पाणी आहे. पाण्यात बुडाली ला हाऊस काढायचा म्हटलं तरी 24 आठवडे लागतील. तोपर्यंत उसाची डोळे फुगून कर येऊन उस कुजनार आहे. हा पूर्ण ऊस खराब होणार आहे. त्यामुळे शेतकरी बाळासाहेब मिठारी यांच लाखो रुपयांचा नुकसान झालं आहे. शिवाय पुढील हंगामात सुद्धा फटका बसणार आहे.
साताराऱ्यातही महापुरामुळे ऊस शेतीचे नूकसान झाले आहे महापुरामुळे ऊस शेती धोक्यात आली आहे त्यामुळे ऊस टंचाई निमार्ण होण्याची शक्यता आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा, भोगावती तसेच वारणा या प्रमुख नद्यांच्या महापुराने सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील नदीकाठची ऊस शेती पाण्यात गेली.
महापुरामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील उसाची शेती उद्ध्वस्त झाली आहे. साखर उत्पादनाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील हे तीन जिल्हे महत्त्वाचे आहेत. मात्र, आठवडा, पंधरा दिवसांपासून या जिल्ह्यातील नदीकाठची ऊस शेती अस्तित्वाचा सामना करीत आहे. महापूर आणि त्यानंतरही अतिवृष्टीमुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या भागात आडसाली उसाची लावण गतीने सुरू होती. अनेकांच्या कोवळ्या लावणी वाढीला लागल्या होत्या. मात्र, कोवळ्या आडसाली लावणी पुराने कुजू लागल्या आहेत. आता जरी या लावणी सावरल्या तरी त्याचे व्हायचे ते नुकसान झालेले आहेच. महापूर, उत्पादनात घट यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
सलग दोन हंगामांत कारखाने अडचणीत
मुसळधार पाऊस, महापुराने तयार उसासह आडसाली लावणी कुजू लागल्याने पूर्व हंगामी लावणी लांबणीवर पडणार आहेत. यातून फुटवा घटल्याने एकरी उत्पादन घटणार आहे. तसेच, सन 2021-22 च्या हंगामासाठी उसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे पुढील वर्षीही ऊस उत्पादन घटणार आहे. कारखाने आणि ऊस उत्पादकांना किमान पाच हजार कोटींच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
साखर उतारा घटणार
या पट्ट्यातील साखर कारखान्यांना सन 2022- 23 च्या गळीत हंगामात फार मोठा फटका बसणार आहे. उसाच्या एकरी उत्पादनात घट तसेच तोडी लांबल्याने कारखान्यांना कमी साखर उताऱ्याचा सामना करावा लागणार आहे. अजूनही तयार ऊस पिकांत पाणी साचून राहिल्याने पिकाची वाढ बंद झाली आहे. ऊस कमी उपलब्ध होणार असल्याने गळीत हंगाम आणि कारखान्यांचे अर्थकारण याला तुटीचा सामना करावा लागणार हे निश्चितच आहे.
राज्यात भासणार उसाची टंचाई ?
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे उसाच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. लाखो एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात साडपलाय. हे आहेत सांगलीच्या पलूस तालुक्यातले शेतकरी बाळासाहेब मिठारी... कृष्णेला आलेल्या पुरात त्यांची ऊस शेती पूर्णपणे बुडालीये. त्यांनी 35 एकरांवर ऊस लावला होता. त्यात पाणी शिरलंय. पूर ओसरला, तरी शेतातलं पाणी कायम आहे. ऊस काढणीला अद्याप 24 आठवडे बाकी आहेत. तोपर्यंत पाण्यामुळे उसाचे डोळे फुगून तो कुजून जाण्याची भीती आहे. यात बाळासाहेबांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे. शिवाय पुढला हंगामही हाती येण्याची शक्यता कमी आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राज्यातलं उसाचं कोठार. तिथंच महापुरानं थैमान घातल्यामुळे उसाची गोडी कमी होणार आहे. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांचं आर्थिक गणित या पुरानं पार बिघडवून टाकलं आहे.