मुंबई : Weather Update: देशात पुन्हा एकदा पावसाचे ढग आहेत. आज देशातील काही राज्यांत पाऊस पडेल तसेच कडाक्याच्या थंडी वाढणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा तर खान्देश आणि विदर्भात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
कडाक्याच्या थंडीतही पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज शनिवारी महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण . पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ आकाश राहिल.तसेच हलका पाऊस अपेक्षित आहे. येत्या 24 तासानंतर राज्यात किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू घसरण अपेक्षित आहे. दिल्ली , उत्तर प्रदेश, हरियाणा (हरियाणा) आणि राजस्थान (राजस्थान) मध्ये काही भागात पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, घसरलेल्या तापमानामुळे लोकांचे टेन्शनही वाढणार आहे.
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा तर खान्देश आणि विदर्भात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुतीला अवकाली पाऊस आणि गारपीट झाली होती. याचा फटका शेतकऱ्याला बसला होता.
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज गाझियाबाद, लोनी देहत, हिंडन, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, मानेसर, दिल्ली आणि एनसीआरमधील बल्लभगडमध्ये पाऊस पडेल.
याशिवाय हरियाणाच्या अलीगढ, नांदगाव, सिकंदराऊ, बरसाना, राया, हाथरस, मथुरा, सादाबाद, तुंडला, आग्रा आणि कुरुक्षेत्र, कैथल येथे पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राजस्थानमध्ये आजही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थानच्या अलवर, विराटनगर, लक्ष्मणगढ, राजगड, भरतपूर आणि मेहंदीपूर बालाजीमध्ये पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स. जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात, संपूर्ण देशात 31.2 मिमी अधिक पाऊस पडला, जो सामान्य 9.7 मिमीच्या तुलनेत 222 टक्के आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की त्याच वेळी, पूर्व आणि ईशान्य भारतात 9.3 मिमीच्या तुलनेत 12.7 मिमी, वायव्य भारतात 60.1 मिमी सामान्य 17.4 मिमी आणि मध्य भारतात 21.3 मिमी पाऊस पडला.