गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही - ऊर्जामंत्री

गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही, असं  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.४ वर्षात ४० लाखांपैकी ९ लाख शेतकऱ्यांनी वीज बील भरलं नाही. 

Updated: Dec 20, 2017, 07:13 PM IST
गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही - ऊर्जामंत्री title=

नागपूर : गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही, असं  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.४ वर्षात ४० लाखांपैकी ९ लाख शेतकऱ्यांनी वीज बील भरलं नाही. 

थकबाकीदार शेतकऱ्यांनी केवळ ३ हजार रुपये भरून बाकीची रक्कम ५ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत देण्यात आली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

वीज वितरण कंपनीला ट्रान्सफॉर्मार आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच नवीन कामासाठी ३ हजार कोटींची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतक-यांच्या वीज बील वसूली बाबतच्या चर्चेवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार घातला.