जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल?

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं दिले आहेत. 

Updated: Nov 15, 2022, 10:09 PM IST
जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल? title=

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक(Nawab Malik ) सध्या कथीत मनी लाँड्रिंग प्रकरणात(Money laundering) आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमधून बाहेर पडण्यासाठी मलिक यांची धडपड सुरु आहे. अशातच आता नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये(Atrocities Act) गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं दिले आहेत. 

मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल वाशिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  या प्रकरणी समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र, याचिका समीर वानखेडेनी स्वतः दाखल करावी असे निर्देश न्यायालयाने दिले होत. तेव्हा समीर वानखेडे यांनी स्वतः वाशिम येथे येऊन 24 ऑगस्ट रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मलिकांना सध्या बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीनं अटक केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून मलिक जलेमध्ये आहेत. त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फोटाळला आहे.