Viral video : अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग...'पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला' मनाला स्पर्श करणारे शब्द...अवघ्या काही दिवसांनी अख्खा महाराष्ट्र विठुमय होणार आहे. पारंपरिक खेळ, ग्यानबा, तुकारामच्या घोषात वारकरी एक एक पाऊल पंढरीनाथाकडे चालत जाणार आहे. त्यापूर्वी सोशल मीडिया विठुरायाचा भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, सोशल मीडियावर पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन प्रसन्न करतोय. सध्या शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे फावल्या वेळ काय करायचं असा प्रश्न पोरांना पडतो. ग्रामीण भागात लहान मुलं शेतकामात, घरकामात अगदी देवाच्या भक्तीत रमताना दिसतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही चिमुकले विठ्ठलाच्या जयघोषावर ठेका धरताना दिसतं आहे. त्यांच्या शेजारी असलेलं हे हरिणदेखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत तल्लीन झाला आहे. हा व्हिडीओ थेट काळजाला जाऊन भिडतो. भजनामध्ये दंग झालेला हा हरीण नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय.(viral video deer dance hearing the bhajan harin bhajan Pandharpur Vitthal ahamadnagar video google Trending Now)
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अहमदनगर येथील बालंटाकळी तालुक्यातील शेवगावमधील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर
khaki_cha_rubab या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये साध्वी किर्तनकार ह.भ. प. शितल देशमुख यांच्या कन्हैय्या आश्रमातील हरीण चक्क बालगोपाल सोबत हरिपाठामध्ये रमलेला दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी परिसरातून अनेक जण आश्रमात येतात व नकळत हरिपाठ म्हणत स्वतः देखील तल्लीन होऊन जातात.