अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या कोणाला कुठल्या गोष्टीचा गर्व वाटेल हे सांगण कठीणच. कधी कधी आपल्याला वाटतं की यश (Success and Failure) नक्की कशाला म्हणतात. आपल्या वाईट कामामुळेही कोणाला यशवंत झाल्यासारखं वाटेल यातही आता काही नवलं राहिलं नाही. सध्या असाच एक व्हिडीओ (Video Viral on Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. या इसमावर एक हत्येचा (Murder) आरोप आहे तरीही या इसमाला काहीही फरक पडताना दिसत नसून त्याचे मित्र तर त्याच्या बेलच्या जल्लोषाचा (Video After Getting Bail) व्हिडीओ करताना दिसत आहे. (viral video a crinimal gets happy and celebrates his bail with friends and makes a video)
नागपूरतील (Nagpur News) गुन्हेगारावर पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित होईल असा एक व्हिडिओ (Viral Video in Nagpur) व्हायरल झाला आहे, नागपुरातील गुन्हेगार किती निर्धास्त आहेत याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 13 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोशन बिहाडे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात आणले तेव्हा हत्येचा एक आरोपी अच्छी इंदुरकरला पोलीस व्हॅन मधून फिल्मी डायलॉगबाजी करताना त्याच्याच टोळीतील इतर तरुणांनी चित्रित केले. ''आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल'' , असे असे डायलॉग वापरताना या गुन्हेगाराचा व्हिडिओ त्याच्या मित्रांकडून शूट (Shoot) करण्यात आला.
हा गुन्हेगार एवढ्यावरच थांबला नाही तर जेल मधून सुटून आल्यानंतर आपल्याला 50 लाख रुपयांची आणखी एक टीप म्हणजेच गुन्हेगारीचा काम मिळणार आहे असं ही तो आपल्या टोळीतील इतर मित्रांना (Friends) सांगतोय. हा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला असतानाही त्याचे मित्र त्याला गुटखा खर्रा सर्व मिळाला ना अशी विचारणा ही करत आहेत. हे व्हिडिओ व्हायरल (Viral News Nagpur) झाल्यानंतर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असतानाही किती निर्धास्त असतात आणि पोलिसांसमोर इतर गुन्हेगार मित्रांकडून त्यांची सर्व बडदास्त ठेवली जाते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.