विदर्भात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट

तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Updated: May 17, 2019, 06:52 PM IST
विदर्भात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट title=

नागपूर : राज्यात उन्हाचा कडाका वाढतच आहे. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. आता विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. पारा ४७ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

नागपुरात आज ४५.५ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूरला ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळपासून उन्हाचे चटके बसत होते. दुपारनंतरही चांगलाच उष्मा जाणवत होता. पुढील तीन दिवस पारा अजून चढणार आहे. नागपूर, चंद्रपूरमध्ये पारा ४७ अंशापर्यंतही जाण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळे नागिरकांनी योग्य ती काळजी  घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.