Bharat Bhalke Join BRS : बीआरएसनं राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केलाय. पंढरपूरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ते आज बीआरएससोबत जाण्याचा निर्णय घेणार आहेत. 27 जून रोजी भालके यांच्या सरकोली गावात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव येणार आहेत. यावेळी बीआरएसचा मोठा मेळावाही होणार आहे. यावेळी पक्षप्रवेश होणार आहे.
तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 जून रोजी पंढरपुरात येणार आहे. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे सहकारी विठट्ठलाचं दर्शन घेणारेत तसंच विठ्ठूरायाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेण्यासाठी केसीआर आणि नेतेमंडळी जातील अशी माहिती बीआरएसचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिलीये.
भारत राष्ट्र समितीमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल अशी भीती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मोठा फरक फडणार नाही मात्र मतांमध्ये विभागणी होईल असेही भुजबळ म्हणाले. बीआरएस जोरदार प्रचार करत असल्याची कबुलीही भुजबळांनी दिली आहे. BRS, वंचितकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असंही विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी म्हणाले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात BRSने ग्रामपंचायतीत पहिलं खातं उघडलं आहे. भारत राष्ट्र समितीच्या सुष्मा मुळे यांची गंगापूर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी छत्रपती संभीजनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीतून BRSनं महाराष्ट्रात खातं उघडले होते. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायतीमध्ये BRSचा उमेदवार विजयी झाला होता. गफूर सत्तार पठाण 115 मतांनी विजयी झाले होते.
आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश केलाय. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात काही सहका-यांसोबत प्रवेश केला.
महाराष्ट्रातील 10-11 माजी आमदार के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला गेले होते. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील हे माजी आमदार BRS च्या वाटेवर असल्याची चर्चा होते . राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरमधील नेते भगीरथ भालके आपल्या कुटुंबासह हैदराबादला गेले होते.तेव्हा पासूनच ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती.