भाज्यांना कवडीमोल दर, कोथिंबीर रस्त्यावर फेकली

 कोथिंबिरीसह भाज्यांना कवडीमोल दर (Vegetable prices)  मिळत आहे. शेतकऱ्यांवर कोथिंबीर (cilantro) रस्त्यावर फेकून देण्याची वेळे आली आहे.  

Updated: Dec 4, 2020, 09:38 PM IST
भाज्यांना कवडीमोल दर, कोथिंबीर रस्त्यावर फेकली   title=

योगेश खरे / नाशिक : कोथिंबिरीसह भाज्यांना कवडीमोल दर (Vegetable prices)  मिळत आहे. शेतकऱ्यांवर (Farmers) कोथिंबीर (cilantro) रस्त्यावर फेकून देण्याची वेळे आली आहे. तर फळांचे दर मात्र वाढले आहेत. शेतमालासाठी शेतकरी एकीकडे दिल्लीत आंदोलन करतोय तर दुसरीकडे नाशिकच्या गल्ल्यांमध्ये मात्र कोथिंबीर अक्षरशः फेकून दिलेली पाहायला मिळतेय. कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची वेळ का आली ?

दोन महिन्यांपूर्वी ज्या कोथिंबिरीने शेतकऱ्याला लाखो रुपये मिळवून दिले, तीच कोथिंबीर शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या रस्त्यांवर अक्षरशः फेकून दिली आहे. कारण कोथिंबीरीला अतिशय कमी भाव मिळतोय. जुलैमध्ये कोथिंबिरीच्या जुडीला शंभर ते दीडशेचा भाव होता. पण गुजरातमधले लॉकडाऊन आणि कोथिंबिरीची मागणी कमी झाल्याने कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली. हीच गत भोपळा, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी, मेथीच्या बाबतीत झाली. 

इतर राज्यांतूनही भाजीपाल्याची आवक वाढलीय. त्यामुळे भाव कमी मिळतोय. अवकाळी पाउस आणि आता थंडीमुळे पिकांना फटका बसला आहे. त्यातच इतर राज्यांतल्या बाजारपेठा अजून बंद असल्याने शेतकऱ्याच्या शेतात जे पिकते, ते विकलंच जात नाही आहे.