Vegetable price Hike : मान्सूनच आगमन यंदा वेळेत झालं असली तरी पावसाने सध्या दांडी मारलीय. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यात मध्यंतरी मान्सूनपूर्व म्हणजे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले होते. अशात पुन्हा एकदा बदलत्या वातावरणाचा फटका हा शेतकऱ्यांसोबत गृहिणीच्या किचन बजेटला बसतोय. कारण पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव वधारले आहेत. कारण मार्केटमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाली असून सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर घसरली आहे. (Vegetable Rate Hike)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर भागातून पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक होते. तर बाजार समितीने खरेदी केलेला शेतमाल हा मुंबईसह, गुजरात अहमदाबादला पाठवण्यात येते. तर त्यातील काही माल हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी बाजारातून माल खरेदी करतात. मुळातच बाजार समितीत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वांच फटका बसलाय.
कोथिंबीर (गावठी)
40 रू.झुडी ते 128 रू. झूडी
चायंना
35 रू.झुडी ते 132 रू. झूडी
मेथी
20 रू.झुडी ते 55 रू. झूडी
शेपू
25 रू.झुडी ते 61 रू.झूडी
कांदापात
30 रू.झुडी ते 97 रू.झूडी
काकडी - 25 रुपये किलो 49 रुपये किलो दर
गिलके - 55 रुपये प्रति किलो पासून ते 70 रुपये किलो
कारले - 75 रुपये ते 80 रुपये प्रति किलो
दोडका - 75 ते 85 रुपये प्रति किलो
शिमला मिरची - 65 ते 75 रुपये प्रति किलो
हिरवी मिरची - 75 रुपये ते 90 प्रति किलो रुपये,
वाल - 80 प्रतिकिलो ते 100 रुपये प्रतिकिलो
गवार - 45 ते 55 रुपये प्रतिकिलो
घेवडा - 100 ते 125 रूपये प्रतिकिलो
वांगी - 40 ते 50 रुपये प्रतिकिलो