Valentine Day 2023 : रामदेव बाबांच्या परवानगीनेच... नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या Love Story मध्येही आला होता मोठा ट्विस्ट

अमरावतीतील राणा दाम्पत्य हे राजकीय क्षेत्रातील पॉवर कपल मानलं जातं. त्याचं वैयक्तीक आयुष्य देखील तितकचं इंटरेस्टिंग आहे (Navneet Rana And Ravi Rana Love Story Valentine Day 2023). 

Updated: Feb 14, 2023, 04:52 PM IST
Valentine Day 2023 : रामदेव बाबांच्या परवानगीनेच... नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या Love Story मध्येही आला होता मोठा ट्विस्ट  title=

Navneet Rana And Ravi Rana Love Story : जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023 ) म्हणजे प्रेमाचा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rane) या दाम्पत्याने देखील आगळावेगळा पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वेळात वेळ काढून हे दोघे जण कॉफी डेटवर गेले होते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने या दोघांची  Love Story पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या Love Story मध्येही मोठा ट्विस्ट  आला होता.  रामदेवा बाबांच्या परवानगीनेच त्यांचे प्रेम जुळले होते. 

कोण आहेत नवनीत राणा आणि रवी राणा ?

नवनीत राणा (MP Navneet Rana) या अमरावती लोकसभा मतदार संघातील अपक्ष खासदार आहेत. तर, त्यांचे पती रवी राणा (Ravi Rane) हे बडनेरा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार आहेत. वैवाहिक आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ हे देणार हे जोडपं राजकारणातही एकमेकांच्या सोबत असतात. लव्ह जिहादचे आरोप करणाऱ्या राणांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. 

अभिनेत्री ते खासदार

नवनीत राणा यांच्या वैयक्तिक जीवनावर बरीच चर्चा झाली आहे. नवनीत राणा मुळच्या मुंबईच्याच आहे. 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत नवनीत कौर राणा यांचा जन्म झाला.  त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते आणि ते मूळचे पंजाबचे आहेत. अभिनेत्री ते खासदार अशी नवनीत राणा यांची जर्नी आहे.  नवनीत यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केले. नवनीत यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटांमधून केली. अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

बाबा रामदेव यांच्यामुळे झाले नवनीत राणा आणि रवी राणा यांचे लग्न

नवनीत कौर यांचा योग आणि बाबा रामदेव यांच्याशी जवळंच नातं आहे. त्यांची पती रवी राणा(Navneet Kaurt-Ravi Rana Love Story) यांच्यासोबतची पहिली भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात होती. जेव्हा ते दोघे योग शिबिरात सहभागी घेण्यासाठी आले होते.  बाबा रामदेव यांच्या आश्रमात भेटल्यानंतर नवनीत कौर आणि रवी राणा एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 फेब्रुवारी 2011 रोजी नवनीत आणि रवि राणा यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. या विवाह सोहळ्यात एकूण 3162 जोडपी लग्न बंधनात अडकली. त्यावेळी रवी राणा आमदार होते आणि यामुळे दोघांचे लग्न खूप चर्चेत होते. 

प्रेमातील गोडवा कायम

या दोघांमधील प्रेमाचा गोडवा आजही कायम आहे. महाविकास  आघाडी सरकारच्या कालात हुमानचालीसा प्रकरणात नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाली होती. यांनतर दोघांची भेट झाल्यावर नवनीत राणा या रवी राणा यांचा हात हातात घेवून रडल्या होत्या. तेव्हा देखील या दोघांमधील प्रेमळ नातं पहायला मिळाले होते. आज दोघांनी वेळात वेळ काढून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दोघेही सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते.  मात्र, दुपारच्या सुमारास आमदार रवी राणा हे अमरावतीच्या एका कॅफे मध्ये आले व त्यांनी येथेच खासदार नवनीत राणा यांना बोलावले.  गुलाबाचे फुल देऊन त्यांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या व एकत्र कॉफी घेतली.