अवकाळीच्या तडाख्याने काद्याचा वांदा; द्राक्षं, डाळिंबही मातीमोल

दोन दिवसांच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. 

Updated: Mar 23, 2021, 07:13 PM IST
अवकाळीच्या तडाख्याने काद्याचा वांदा; द्राक्षं, डाळिंबही मातीमोल  title=

मुंबई : दोन दिवसांच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. उन्हाळी कांदा आता कुठे येऊ लागला होता.

तेवढ्यात पावसाने कांद्याच्या पिकाची नासधूस केली. निफाडमधल्या गणेश देशमुखांनी एक एकरावर द्राक्षबागेची लागवड केली. 2 लाखांचं कर्ज काढलं होतं. पोटच्या पोराप्रमाणे द्राक्षं फुलवली. द्राक्षांची खुडणीही सुरू केली. पण तेवढ्यात पाऊस आला आणि होत्याचं नव्हतं झालं. 

  • नाशिक जिल्ह्यात जवळपास पाच हजार 700 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज 
  • एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतक-यांना दीडशे कोटीचा फटका 
  • 4966 हेक्टर कांद्याला फटका 
  • 110 हेक्‍टरवरची डाळिंब आणि 20 हेक्‍टरवरची द्राक्षं मातीमोल 
  • 44 हेक्टर भाजीपाला ,196 हेक्टर गव्हाचं, 45 हेक्टरवरच्या हरभऱ्याचं, तर 115 हेक्टर मक्याचं नुकसान. 

या अवकाळी पावसामुळे नाशिकमधल्या कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्षं आणि कांद्याभोवती अख्ख्या जिल्ह्याचं अख्खं अर्थचक्र फिरतं.
ते चक्र या पावसानं पुरतं बिघडवून टाकलंय.