मुलाच्या अटकेनंतर नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Narayan Rane to visit Sindhudurg :भाजप आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे कणवलीत दाखल होत आहेत. त्यामुळे राणे आपल्या मुलाच्या अटकेवर भाष्य करतात का, याची उत्सुकता आहे.

Updated: Feb 4, 2022, 09:00 AM IST
मुलाच्या अटकेनंतर नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर title=

सिंधुदुर्ग : Narayan Rane to visit Sindhudurg :भाजप आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे कणवलीत दाखल होत आहेत. नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुलाला अटक झाल्याने ते कणकवलीत दाखल होणार आहेत. त्यामुळे राणे आपल्या मुलाच्या अटकेवर भाष्य करतात का, याची उत्सुकता आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज  कणकवली येत आहेत. आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर दिल्लीत असणारे राणे हे  कणकवलीत दाखल होत आहेत. आज नितेश राणे यांची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपत आहे. त्यांना कणकवली पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाणार आहे.आता आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी मिळणार की पुन्हा पोलीस कोठडी? याबद्दल सिंधुदुर्गमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीआहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.आज त्यांची पोलीस कोठडी संपत आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल न्यायालयात सादर केला. नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असं म्हणणं पोलिसांनी मांडले आहे. त्यांना कोठडी मिळाल्यानंतर काल नितेश राणे यांना घेऊन पोलीस गोव्यात गेले होते. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. 

नितेश राणे यांना अटक केल्यानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणाव जमले  होते. त्यांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. न्यायालय आवारात गोंधळ घातल्याने आणि जमाव केल्याप्रकरणी जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानंतर माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.