पिंपरी चिंचवड : काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिसांनी थेरगाव क्विन म्हणून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षी श्रीश्रीमळ तरूणीला ताब्यात घेतलं होतं. सोशल मीडियावर शिवीगाळ करणारे व्हिडीओ अपलोड करत असे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी स्वंयघोषित थेरगाव क्विनसह एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती. यातील कुणाल कांबळे या 'भाई'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
थेरगाव क्विन आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी चांगलाच दम भरला आहे. यानंतर कुणाल कांबळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कुणाल कांबळे माफी मागत आहे. माझ्यामुळे अनेक महिलांची मन दुखावली गेली. यामुळे मी माफी मागतो, अशा आशयाचा हा व्हिडीओ आहे.
पोलिसांनी फरार असलेल्या कृणाल कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी आपला अवतार दाखवताच या तरुणाने माफी मागितली. अशी थेरं पुन्हा कधी करणार नाही, असा माफीनामा त्याने लेखी लिहून दिला.
थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी महाले आणि साक्षी कश्यप यांना अटक करण्यात आली होती.
झटपट प्रसिद्धीसाठी ही तिकडी सार्वजनिक ठिकाणी व्हीडिओ बनवायचे. या व्हीडिओमध्ये अश्लील संवाद आणि शिव्या असायच्या. थेरगाव क्विन या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे व्हीडिओ व्हायरल केले जायचे.
संतापजनक म्हणजे हे असे व्हीडिओ अनेक जण पाहायचे. धक्कादायक म्हणजे कुमारवयीने मुलं या थेरगाव क्विनला फॉलो करतात. इतकच नाही, तर मोठी माणसंही या थेरगाव क्विनचे व्हीडिओ शेअर करुन या अपप्रवृत्तीला हातभार लावायचे.