LIVE : नारायण राणेंची पत्रकार परिषद, गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले?

नारायण राणे-शिवसेना राड्याचे महाराष्ट्रभर पडसाद 

Updated: Aug 24, 2021, 12:08 PM IST
LIVE : नारायण राणेंची पत्रकार परिषद, गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले? title=

चिपळूण : नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. पुणे, महाड, नाशिकमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथकही रवाना झालं आहे. असं असताना चिपळूणमध्ये नारायण राणेंनी या सगळ्या घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. 

नारायण राणे काय म्हणाले? 

शिवसैनिकाला घाबरत नाही... कुठलाही गुन्हा दाखल केला नाही.. चिपळूमध्ये नारायण राणे आहे. दगडफेक करण हे पुरुषर्थ नाही, असं नारायण राणे म्हणाले. 
माझ्या गुन्हा दाखल झाला मला माहित नाही. मी गुन्हा केलेला नाही. मी भीक घालत नाही शिवसैनिकांना, अशी प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी दिली आहे. 

जनाशीर्वाद यात्रा ठरल्याप्रमाणे होणार, असं देखील राणे यावेळी म्हणाले.  शिवसेनेच्या आक्रमकतेला आम्ही जुमानत नाही. राणेंनी शिवसेना सोडली त्याच वेळी आक्रमक शिवसेना गेली, असंही यावेळी नारायण राणे यावेळी म्हणाले.