उल्हासनगरमध्ये GIS सर्वेक्षणाचे कागदपत्र फाडल्याने व्यापाऱ्याला अटक

 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Updated: Jul 15, 2019, 09:30 PM IST
उल्हासनगरमध्ये GIS सर्वेक्षणाचे कागदपत्र फाडल्याने व्यापाऱ्याला अटक title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : मालमत्ता कराशी संबंधित जी-आय-एस मॅपिंगच्या सर्वेक्षणाला आलेल्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्र फाडणे  उल्हासनगरमधील एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी त्या व्यापाराला अटक केली आहे. 

दरम्यान हा व्यापारी कागद पत्र फाडत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी दुपारी उल्हासनगर महानगरपालिकेन मॅपिंग करण्यासाठी ठेका दिलेले कोलब्रो कंपनीचे कर्मचारी मराठा सेक्शन मुख्यरस्त्याजवळ जी-आय-एस सर्वेक्षण करीत होते. यावेळी परमानंद गेरेजा या व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांकडील कागद पत्र फाडून त्यांना धमकावले आणि सर्वेक्षण करण्यास विरोध केला. 

या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली .अटक व्यापाराला  न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.