Maharashtra Politics: सर्व वाद संपणार; उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार?

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray :  आज भी अच्छे रिलेशन है... हमारे मन में कटुता नही... मेरा दिल साफ है...  उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वक्तव्यामुळे यांच्यातील वाद संपणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंनी देखील यावर भाष्य केले आहे. 

Updated: Mar 8, 2023, 08:49 PM IST
Maharashtra Politics: सर्व वाद संपणार; उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार? title=

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तुटली. काही काळ विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारत पुन्हा सत्तेत सहभाग घेतला. 2019 च्या  विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची स्थापना करुन सत्ता मिळवली आणि भाजपला विरोधी पक्षाच्या बाकावर बसवले. यानंतर  एकनाथ शिंदे बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करत शिवसेनेला रातोरात सत्तेतून पायउतार केले. यामुळे भाजप आणि ठाकरेंमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. कारण ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तशा प्रकारचे संवाद पहायला मिळाले आहेत. 

आज भी अच्छे रिलेशन है... हमारे मन में कटुता नही... मेरा दिल साफ है...  उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वक्तव्यामुळे यांच्यातील वाद संपणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंनी देखील यावर भाष्य केले आहे. 

देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. तर, फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरज असल्याचे मत फडणवीसांनी व्यक्त केले.  फडणवीस यांच्याशी शत्रुत्व नाही वैयक्तीक मतभेद आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी दोस्तीचा हात पुढं केल्यानंतर फडणवीसही मागे राहिले नाहीत. उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं फडणवीसांनी स्पष्ट करून टाकले. ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. 'जानी दुश्मन' पुन्हा जिगरी दोस्त बनणार? अशी चर्चा रंगलेय.

भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरात सूर 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली कटुता संपणार का? याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.. होळीच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरात सूर जुळू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्रास देणा-यांना आम्ही माफ केले. आमच्या मनात कसलीही कटुता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर, पॅचअपबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.